शुद्ध क्रिया प्रयोजन
अशा विविध शारीरिक व मानसिक क्रिया घडवून आणणार्या प्राणशक्तीचे वहन करणाऱ्या नाड्या जितक्या स्वच्छ व शुद्ध मलरहीत असतील तितके आपले शरीर कार्यक्षम राहील. पण जर नाड्या मला ने भरलेल्या मला कॉल असतील तर प्राणशक्तीचे प्रवाहात अवरोध निर्माण होईल. आणि परिणामस्वरूप शरीर सुचारू पणे कार्य करणार नाही. अशा ह्या प्राणशक्तीचे वहन करणाऱ्या बहात्तर हजार नाड्या शुद्ध राखण्यासाठी योगशास्त्र आणि शुद्ध क्रिया ची योजना केली आहे.
शुद्ध क्रिया चे प्रकार किती?
शुद्ध क्रियेचे धौती, बस्ती, नौली, त्राटक, नेती, आणि कपालभाती असे सहा प्रकार सांगितले आहेत. घेरंड संहितेत पण शुद्ध क्रियेचे सहा प्रकारात वर्गीकरण केले असले तरी धौती, बस्ती व कपालभाती या क्रियांचे बरेच पोटभेद सांगितले आहेत. सत्कर्म संग्रहामध्ये पण काही शुद्ध क्रिया यांचे वर्णन केले आहे. अन्न व पाणी आणि हवा या आपल्या शरीरात साधनेच्या दृष्टीने, मूलभूत गरजा आहेत. त्या शरीरास पुरवण्याचे कार्य पचनसंस्था व श्वसन संस्थेच्या माध्यमातून केले जाते. या दोन्ही संस्थांच्या कार्यक्षमतेवर आपले आरोग्य निर्भर असते क्या संस्थेत निर्माण होणारे दोष दूर करण्यासाठी व त्या शुद्ध कार्यक्षम ठेवण्यावर योग्य शास्त्राने विशेष भर दिला आहे आयुर्वेदाने ज्याप्रमाणे स्वास्थ रक्षणासाठी पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे त्याच प्रमाणे योगशास्त्राची ही स्वतंत्र अशी षटकर्म चिकित्सा होय आयुर्वेदिक पंचकर्म औषधे यांचा उपयोग केला जातो पण योगशास्त्रातील शुद्धिक्रिया साठी पाणी मीठ यासारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो त्यादृष्टीने निसर्गोपचाराचा शुद्ध क्रियांना महत्त्वाचे स्थान दिली जाते वर उल्लेख केलेल्या सर्व शुद्ध क्रियांचे वर्णन या ठिकाणी करण्याचा विचार नाही तरी पण नेहमी त्रास देणाऱ्या वचन बुद्ध गोष्ट पडसे यासारख्या तक्रारींवर उपचार म्हणून उपयोगी पडतील अशा काही निवडक शब्द क्रियांचे संक्षिप्त वर्णन पुढे केली आहेत
वारिसार धौती, शंख प्रक्षालन
घेरंड संहितेत धौती या क्रियेत जे अनेक पोटभेद सांगितले आहेत. त्यात पाण्याचा उपयोग करून तोंडातून गुद द्वारा पर्यंत पर्यंतचा संपूर्ण अन्नमार्ग स्वच्छ दुनिया साठी उपयुक्त अशा क्रियेचे वर्णन केले आहे
पूर्वतयारी
ही क्रिया करताना ताडासन तिर्यक ताडासन कटिचक्रासन तिर्यक भुजंगासन आणि उदर आकर्षण ही 5 असणे करावी लागतात.
साहित्य व समय
या क्रियेसाठी साधारण चार लिटर आपल्या शरीराच्या तापमानाचे इतपत कोमट पाणी चांगले स्वच्छ मीठ आणि एखादे मोठे कागदी लिंबू व पाणी पिण्यासाठी ग्लास एवढे साहित्य लागते ही क्रिया सकाळी जेवणापूर्वी करावी.
लघु शंख प्रक्षालन
कृती
कोमट पाण्यात याला चांगली
खारट चव येईपर्यंत मीट मिसळावे व त्यात एका लिंबाचा रस घालावा अशा प्रकारे तयार केलेले दोन ग्लास पाणी गटागट प्यावे आणि लगेच वर नमूद केलेली पाच असणे त्याच क्रमाने करावीत याप्रमाणे पाच आसनाचे आवर्तन पूर्ण झाले की पुन्हा दोन ग्लास पाणी प्यावे आणि वरील प्रमाणे परत याच पाच हसण्याचे वर वर्णन केल्याप्रमाणे आवर्तन करावे न थांबता परत दोन ग्लास पाणी पिणे व आसनाची आवर्तने करणे हा क्रम चालू ठेवावा साधारणत सहा ते आठ ग्लास पाणी पिऊन झाल्यावर मलविसर्जनाची भावना झाली असल्यास वेग थोडा आवरून धरावा व नंतर मलविसर्जन करावे एकदा मलविसर्जन झाले की पाणी पिणे व आसने करणे थांबवावे त्यानंतर तीन ते चार वेळा मलविसर्जन करावे लागत
व स्वच्छ पाणी बाहेर पडले की थोडी विश्रांती घ्यावी व साधारण दोन तासांनी मुगाची डाळ तांदळाची खिचडी पाच ते सहा चमचे तूप घालून खावी एक ते दोन दिवस शक्यतो हलका आहार घ्यावा वर वर्णन केलेल्या क्रियेस लघुशंख प्रक्षालन असे म्हणतात संपूर्ण क्रियेच्या वेळी मलविसर्जन ना वाटे स्वच्छ पाणी पडेपर्यंत 2 ग्लास पाणी पिणे व आसने करणे हा क्रम सुरू ठेवावा लागतो व नंतर सात ते आठ दिवस आहारावर नियंत्रण ठेवावे लागते दहा ते पंधरा दिवस कडक पत्य सांभाळावे लागते
लाभ
बुद्धकोष्ठ अपचन पित्तप्रकोप यासारख्या तक्रारीवर लाभदायक दूषित रक्तामुळे होणाऱ्या व्याधीवर उपयुक्त शरीरशुद्धी बरोबर चित्तशुद्धी साधते
दक्षता
या क्रियेत चार ते पाच वेळा मलविसर्जन झाले तरी थकवा येत नाही असे असले तरी दोन दिवस फार दगदग होईल अशी कामे टाळावी आठ ग्लास पाणी बहुदा पुरते पण पाण्याची पिण्याची मर्यादा दहा ग्लास पेक्षा वाढवू नये पहिला प्रयोग तज्ञांच्या उपस्थित करावा
You must be logged in to post a comment.